स्वर्गीय नर्तकfil91;mb2j s Zzaap Toiace.svg.s da
स्वर्गीय नर्तक (इंग्लिश:Asian Paradise-flycatcher) (शास्त्रीय नावः Terpsiphone paradisi) हा भारतातील जंगलात आढळणारा पक्षी आहे. नराला लांब शेपूट येते त्यामुळे अतिशय सुरेख दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर हा पांढऱ्या रंगाचा असतो (चित्रीत), नव तरूण नर आणि मादी लाल रंगाची असते. याचे मुख्य खाद्य विविध प्रकारचे किडे आहेत. मध्यप्रदेश राज्याचा हा 'राज्यपक्षी' आहे, त्याला हिंदीमध्ये 'दूधराज' असे नाव आहे. मध्यप्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणावर आढळतात.
बुलबुलच्या आकाराचा हा पक्षी असून नर शुभ्र पांढऱ्या रंगाचा आणि डोके काळ्या रंगाचे तर मादी तांबूस रंगाची आणि डोके काळ्या रंगाचे असते. दोघांच्या डोक्यावर लहानसा तुरा असून विशेष म्हणजे नराला जवळपास फुटभर लांबीची शेपटी असते. युवा नराचा रंग मात्र तांबूस असतो. प्रौढावस्थेतील नर पांढऱ्या रंगाचे असतात. कीटकपक्षी असणाऱ्या या पक्षाचा वीणीचा हंगाम पावसाळ्याच्या पुर्वार्धात सुरू होतो. स्वर्गीय नर्तक हे पक्षी संपूर्ण भारतात आढळत असून यांच्या दोन उपजाती भारतात तर एक उपजात श्रीलंकेत आढळते. हा पक्षी भारताच्या नैऋत्येकडील प्रदेशात स्थानिक असून उर्वरित भागात तो स्थलांतरीत आहे. दरवर्षी जून महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यांची असंख्य घरटी सहज दृष्टीस पडतात. या कालावधीत ते पन्हाळा परिसरात स्थलांतर करून येतात.
अमेरिकन पक्षीतज्ज्ञ डॉ. पामेला रासमुसन यांनी या पक्षाचा जनुकीय अभ्यास करून स्वर्गीय नर्तक पक्षाची आणखी एक उपजात शोधून काढली आहे. त्यातील प्रौढ नर हे तांबूस रंगाचेच राहतात अशी नोंद त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या बर्डस् ऑफ साऊथ आशिया या पुस्तकात आहे.
|
|
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |